Honoring community fitness stars, marathon champions, and 365-day streak holders across Ichalkaranji.
Recognizing citizens for exceptional endurance, health records, and fitness leadership.
Led the Ichalkaranji Swatantra Cyclothon rally
Completed 108 Surya Namaskar sets in under 45 minutes
Completed 9/9 NavDurga daily challenges covering 120+ KM
वैद्यकीय सेवा, योग, सायकलिंग, फिटनेस आणि समाजसेवेच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीची प्रेरणा देणारे आपले अधिकृत ब्रँड अँबेसेडर!
डॉ. योगिनी कुबेर, जिन्हें डॉ. शिवयोगिनी के नाम से जाना जाता है, पैरेंटिंग कोच, ब्रेन एक्सपर्ट, एनर्जी एक्सपर्ट, होलिस्टिक हीलिंग प्रैक्टिशनर और होलिस्टिक काउंसलिंग में विशेषज्ञ हैं। उन्हें भारत और विदेशों में पिछले 18 वर्षों से व्यक्तियों, बच्चों और परिवारों के मार्गदर्शन एवं विकास के क्षेत्र में कार्य करने का अनुभव प्राप्त है।
अपने समर्पित कार्य और अनुभव के माध्यम से डॉ. शिवयोगिनी ने माता-पिता को बच्चों की भावनाओं, व्यवहार, जरूरतों और मानसिक विकास को बेहतर ढंग से समझने के लिए प्रेरित किया है। उनका उद्देश्य माता-पिता को जागरूक बनाना, बच्चों में आत्मविश्वास विकसित करना और परिवारों में प्रेम, विश्वास तथा सकारात्मक संवाद को बढ़ावा देना है।
श्रीगोंदा येथील सौ. विजया मिठ्ठू लंके या वयाच्या ४६व्या वर्षी सायकलिंग, रनिंग, फिटनेस, ट्रेकिंग आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून महिलांसह समाजाला आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा देत आहेत. शिवशंभु सायकल रायडर्स असोसिएशनच्या अध्यक्षा, सपना वेलनेस सेंटरच्या ५ वर्षे ऑनलाइन व्यायाम ट्रेनर आणि "एक मूठ अनाथांची" उपक्रमात संवेदनशील सामाजिक योगदान देत आहेत.
मागील नवदुर्गा रनमध्ये सूर्यनमस्कार प्रकारात प्रथम क्रमांक!
दोन मुलांची आई असलेल्या तेजश्री प्रणय कर्डिले यांनी मातृत्वानंतरही स्वतःच्या फिटनेसला प्राधान्य देत एक प्रेरणादायी प्रवास घडवला आहे.
मुलगा अवघा ६ महिन्यांचा असताना त्यांनी पहिल्यांदा रिंगण नवदुर्गा रन पूर्ण केली. योग व फिटनेस ट्रेनर म्हणून काम करण्यासोबतच गेल्या ३ वर्षांपासून त्या नियमित जिम वर्कआउट करतात.
चिपळूणच्या मातीतून घडलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मनीषा जी. वाघमारे. वैद्यकीय क्षेत्रात नेत्रतज्ज्ञ म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी सायकलिंग, रनिंग, योग, पोहणे आणि ट्रेकिंगच्या माध्यमातून फिटनेसची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
MBBS, DOMS, DNB (Ophthalmology) असलेल्या डॉ. मनीषा वाघमारे या चिपळूण येथे गेल्या १५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्या IMA Chiplun Women Doctors Wing च्या अध्यक्षा असून महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीच्या स्पोर्ट्स कमिटीच्या सदस्य आहेत. तसेच त्या आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका असून YTT 200 तासांचा कोर्स पूर्ण केला आहे.
चिपळूण शहर व परिसरातील महिला, डॉक्टर, तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत फिटनेस, सायकलिंग, रनिंग, योग आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश पोहोचवणे ही डॉ. मनीषा वाघमारे यांची रिंगण नवदुर्गा रन 2026 मधील प्रमुख जबाबदारी असेल.
वैद्यकीय सेवा + फिटनेस + साहसी सायकलिंग + महिलांसाठी प्रेरणा
यांचा सुंदर संगम म्हणजे डॉ. मनीषा जी. वाघमारे.
राहुल शिरसट यांनी धावणे, सायकलिंग आणि जलतरण या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयर्नमॅनसारख्या आव्हानात्मक स्पर्धेत यशस्वी कामगिरी करत त्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक ताकद आणि चिकाटीही सिद्ध केली आहे.
योग आणि समग्र आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हर्षदा महेश कबाडे यांची रिंगण नवदुर्गा रन 2026 साठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्याचा रिंगण फिटनेस फाउंडेशनला मनापासून अभिमान आहे. 🌺
हर्षदा ताई यांनी योग, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून अनेकांना निरोगी जीवनशैलीची प्रेरणा दिली आहे.
🎓 शैक्षणिक पात्रता
▪️ MA in Yoga – योग विषयातील पदव्युत्तर पदवी
▪️ PGDYT – योग थेरपीतील पदव्युत्तर पदविका
🧘♀️ अध्यापन व प्रशिक्षण
▪️ 10+ वर्षांचा अध्यापन व प्रशिक्षणाचा अनुभव
▪️ 500+ विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण
▪️ 50+ विशेष कार्यशाळा व सामुदायिक आरोग्य शिबिरे
🏛️ संस्थात्मक कार्य
▪️ भारती विद्यापीठ, कोल्हापूर – व्याख्याता
▪️ KIT कॉलेज, कोल्हापूर – व्याख्याता
🌿 कार्यक्षेत्र
▪️ माइंडफुलनेस आणि ध्यान
▪️ तणावमुक्त जीवनशैली व समग्र आरोग्य
▪️ योग थेरपी व पुनर्वसन
▪️ नियमित व्यायाम व आरोग्य जनजागृती
▪️ महिलांमध्ये आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण करणे
रामकाका मुळीक, फलटण हे सायकलिंग आणि फिटनेसच्या माध्यमातून सातत्याने स्वतःला आव्हान देणारे आणि इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. सुमारे साडेचार वर्षांच्या सातत्यपूर्ण सायकलिंग प्रवासात त्यांनी पंढरपूर ते घोमन (पंजाब) व घोमन ते कटरा (वैष्णोदेवी) – जम्मू असा ४६,८८२ किमी सायकल प्रवास पूर्ण केला आहे. तसेच वेट लॉस चॅलेंजमध्ये सलग ३ वेळा प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेस आणि वजन नियंत्रणाचा आदर्श निर्माण केला आहे. नवदुर्गा रन २०२६ च्या माध्यमातून फलटण परिसरात धावणे, चालणे, सायकलिंग व नियमित व्यायामासाठी नागरिकांना प्रेरित करण्याची सामाजिक जबाबदारी ते पार पाडत आहेत.
कराडचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल फासे हे वैद्यकीय सेवेसोबतच सायकलिंग, धावण्याच्या चळवळीशी जोडलेले आहेत. सह्याद्री रनर्स, कराडचे संस्थापक म्हणून त्यांनी अनेकांना धावण्यासाठी आणि फिटनेसकडे वळण्यासाठी प्रेरित केले आहे. विविध मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासोबतच रोटरीच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भागात मोफत नेत्रतपासणी, नेत्रोपचार आणि शस्त्रक्रिया करून त्यांनी समाजसेवेचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. फिटनेसची आवड, धावण्याची सातत्यपूर्ण प्रेरणा आणि समाजसेवेची भावना यांचा सुंदर संगम असलेल्या डॉ. राहुल फासे यांची रिंगण नवदुर्गा रन २०२६ चे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
स्वतःच्या कर्तृत्वातून हजारो लोकांना सायकलिंग, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीची प्रेरणा देणाऱ्या प्रशांत दाभोळकर सरांची रिंगण नवदुर्गा रन 2026 चे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड होत असल्याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान आहे.
साध्या MTB सायकलपासून सुरू झालेला प्रवास आज तब्बल ५०,००० किलोमीटरच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचवणारे प्रशांत दाभोळकर सर म्हणजे जिद्द, सातत्य आणि फिटनेसचे प्रेरणादायी उदाहरण.
🎯 ब्रँड अँबेसिडर म्हणून जबाबदारी
महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना
धावणे • सायकलिंग • चालणे • सूर्यनमस्कार
या माध्यमातून फिटनेस चळवळीशी जोडणे आणि “निरोगी जीवनशैली हीच खरी संपत्ती” हा संदेश पोहोचवणे.
प्रशांत सरांचा प्रवास एकच सांगतो—
अंतर मोठं नसतं… जिद्द मोठी असते! 🚴♂️🔥
योग, सायकलिंग, फिटनेस आणि सामाजिक कार्य या चारही क्षेत्रांना जोडून काम करणारे संदीप दळवी हे भुईंज परिसरातील सक्रिय व्यक्तिमत्त्व आहे. “माहेर योग, कला, क्रीडा धाम” तसेच “सायकल वे डे असोसिएशन, भुईंज” यांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यामध्ये रक्तदान शिबिरे, नेत्रतपासणी शिबिरे, सर्व रोग निदान शिबिरे, BMD कॅम्प, योग शिबिरे, बाल संस्कार शिबिरे, सुदृढ बालक स्पर्धा, उंची संवर्धन वर्ग तसेच ज्येष्ठ आणि नातवंडांसाठी चालण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.
Nipani Endurance Sports Association सोबत एंड्युरन्स रनिंगची वाटचाल करणाऱ्या तुषार माळींचा प्रवास म्हणजे केवळ पदकांचा किंवा अंतरांचा प्रवास नाही… तो आहे जिद्दीचा, सातत्याचा, वेदना सहन करण्याचा आणि “थांबायचं नाही” या विचाराचा प्रवास. Navdurga Run Challenge २१ KM × ९ दिवस सलग २ वर्षे पूर्ण केले आहे.
हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली येथील किशोर महादेव माने हे सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेस, सातत्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आतापर्यंत देशातील विविध भागात केलेले प्रदीर्घ सायकल प्रवास (जगन्नाथ पुरी, वाघा बॉर्डर, गिरनार, काश्मीर ते कन्याकुमारी, नर्मदा परिक्रमा) त्यांच्या जिद्दीची साक्ष देतात.
काही माणसं एखाद्या संस्थेशी फक्त सहभागी म्हणून जोडली जात नाहीत, तर आपल्या प्रेमाने, विश्वासाने आणि सातत्यपूर्ण सहभागाने त्या संस्थेच्या परिवाराचा एक भाग बनतात.
श्री. महेश भोसले सर हे रिंगण फिटनेस फाउंडेशनसाठी अशाच जिव्हाळ्याच्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
पंढरपूरचे महेश भोसले सर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा, धावणे, सायकलिंग आणि आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करत आहेत.
श्री रुक्मिणी विद्यापीठ, पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर, पंढरपूर येथे त्यांनी सहशिक्षक म्हणून २६ वर्षे सेवा बजावली आहे.
त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचा “Nation Builder Award – आदर्श शिक्षक सन्मान २०२४”, तसेच न. पा. शिक्षण मंडळ पंढरपूर, मराठा सेवा संघ आणि लायन्स क्लब पंढरपूर यांच्याकडून आदर्श शिक्षक सन्मान मिळाले आहेत. कब मास्टर प्राथमिक प्रशिक्षणात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी सन्मान २०२६ हाही त्यांना प्राप्त झाला आहे.
काही माणसं फक्त धावत नाहीत…
ती आपल्या जिद्दीने इतरांना धावण्याची प्रेरणा देतात.
काही माणसं फक्त सायकल चालवत नाहीत…
ती प्रत्येक किलोमीटरसोबत एक नवा आदर्श निर्माण करतात.
चिपळूणचे Ahamadali Shaikh हे अशाच जिद्दी आणि ध्येयवेड्या एन्ड्युरन्स खेळाडूंपैकी एक आहेत. रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत, रिंगणच्या प्रत्येक चांगल्या कार्यात खंबीरपणे साथ देणारे Ahamadali Shaikh यांची रिंगण नवदुर्गा रन 2026 चे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करताना रिंगणला विशेष अभिमान वाटतो. 💚
🏆 मागील नवदुर्गा रनमधील उल्लेखनीय कामगिरी
मागील वर्षीच्या रिंगण नवदुर्गा रनमध्ये सर्वाधिक रनिंग करून प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी आपल्या सातत्याची आणि फिटनेसप्रती असलेल्या समर्पणाची प्रभावी ओळख निर्माण केली.
योगशास्त्राचा समृद्ध वारसा आणि आधुनिक फिटनेसची सांगड घालत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे युवा योगसाधक व कुशल प्रशिक्षक समीर संभाजी सनगर हे योगक्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व आहेत. ‘योगसम्राट’ किताबाने सन्मानित समीर सनगर यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय योगासन स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकांची कमाई करत आपल्या कौशल्याची प्रभावी छाप उमटवली आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधील सहभागासह SGFI राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पंच म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. योगसाधना, क्रीडा क्षेत्रातील यश आणि युवा पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य यांचा गौरव म्हणून समीर संभाजी सनगर यांची रिंगण नवदुर्गा रन २०२६ चे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
अमित कवितके हे रत्नागिरीचे सुपुत्र, सायकलिंग, ट्रायथलॉन, धावणे यांसारख्या एंड्युरन्स स्पोर्ट्समध्ये सातत्याने कामगिरी करत आहेत. त्यांनी १० महिन्यांत ३ वेळा Super Randonneur आणि २ वेळा Lohapurush (70.3) पूर्ण केले आहे. त्यांचा फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ स्वतःपुरता मर्यादित नसून, समाजात आरोग्याची जाणीव निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय आहे.
सायकलिंग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शिस्त, सातत्य, जिद्द आणि स्वतःला सतत आव्हान देण्याचा प्रवास मानणारे बुलढाण्याचे सायकलिस्ट श्री. सुरज पवार यांची रिंगण नवदुर्गा रन 2026च्या ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाली आहे.
श्री. सुरज पवार यांनी आजपर्यंत तब्बल 924 सायकल राईड्समधून 38,265 किलोमीटरचा सायकलिंग प्रवास पूर्ण केला आहे. यामध्ये 312 वेळा 50 किमी आणि 58 वेळा 100 किमी राईड पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या नावावर आहे.
* नवदुर्गा रन २०२६चा संदेश महाराष्ट्रभर पोहोचवणे.
* सायकलिंग, रनिंग, वॉकिंग आणि सूर्यनमस्कारासाठी लोकांना प्रेरित करणे.
* युवक, महिला व सर्व वयोगटातील नागरिकांना फिटनेसशी जोडण्यासाठी मार्गदर्शन करणे.
* आपल्या संपर्कातील सायकलिंग व रनिंग ग्रुप्सना नवदुर्गामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
* सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेटी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवदुर्गाचा प्रचार-प्रसार करणे.
* “फिटनेस हीच खरी संपत्ती” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे.
विटा शहरामध्ये अनेक महिला आणि पुरुषांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना निरोगी जीवनशैलीची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जयदीप घार्गे सर!
‘फिट विटा, हिट विटा’ या संकल्पनेतून त्यांनी निस्वार्थ भावनेने फिटनेसची चळवळ उभी केली. व्यायामाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवून अनेकांना आरोग्याच्या वाटेवर आणण्याचे प्रेरणादायी कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना विटेकरांनीही मनापासून साथ दिली आणि सामूहिक आरोग्याचा एक सुंदर आदर्श निर्माण झाला.
सायकलिंगप्रेमी | दीर्घ पल्ल्याचे सायकल रायडर | फिटनेस प्रेरक
जिद्द, सातत्य आणि ध्येयपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास!
सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि समाजामध्ये व्यायामाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यरत असलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. हनुमंत तक्कनावर सर!
सायकलिंग हे केवळ अंतर पार करण्याचे साधन नसून ते शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सामर्थ्य, शिस्त आणि चिकाटी विकसित करण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास, मॅरेथॉनमधील सहभाग आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील योगदान यांमुळे त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.
जिद्द, चिकाटी आणि आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा!
सन २०१४ पासून मॅरेथॉन क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले डॉ. किरण पवार सर गेल्या १२ वर्षांपासून धावण्याच्या माध्यमातून फिटनेसचा ध्यास जपत आहेत. विविध आव्हानात्मक मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करत ते समाजात आरोग्यजागृतीही करत आहेत.
आपण स्वतः फिट राहूया... आपल्या माणसांनाही फिटनेससाठी प्रेरित करूया!
रिंगण नवदुर्गा रन २०२६ मध्ये सहभागी व्हा →
Sutarmala morning 5K runs, Swatantra Run half-marathons, and open street running events in Ichalkaranji.
Sunrise cycling rallies across Panchaganga riverbank, Sangli road, and countryside trails around Kolhapur.
Annual 108 Surya Namaskar marathon and riverbank sunrise yoga sessions for health and mindfulness.
79th independence run ~ 15 august